आरोग्य व शिक्षण

कुसगावच्या सरपंच , उपसरपंच व सदस्य यांच्या इच्छाशक्तीमुळे क्रांतीनगरला आज पाणी आलं – सुरेखा जाधव

Spread the love

लोणावळा : कुसगावच्या सरपंच , उपसरपंच व सदस्य यांच्यात इच्छाशक्ती होती म्हणून क्रांतीनगरला आज पाणी आलं . इच्छाशक्ती नसती तर काहीच काम झाले नसते. आम्ही लोणावळा नगरपरिषदेच्या माध्यमातून पाच एकर जागेत डी पी आर केला , तसा आपण ग्रामपंचायतीचे मार्फत केला ;तर सर्व क्रांतीनगरमधील कुटूंबातील माणसांना चांगले घर मिळेल.येथे सुविधा निर्माण होतील,असे लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव भाषणात म्हणाल्या .

कुसगाव बुद्रूक येथील क्रांतीनगरमधील झोपडपट्टीत , घरांना नगरपरिषदेच्या सहकार्याने घरोघरी नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आली.त्याचे उद्घाटन नगराध्यक्षा श्रीमती सुरेखाताई जाधव यांच्या हस्ते झाले , त्यावेळी त्या बोलत होत्या .नगराध्यक्षा  जाधव पुढे म्हणाल्या , आम्ही नगरपरिषदेच्या बॕटरी हील, इंदिरानगर, हनुमान टेकडी मधील कुटूंबातील लोकांना पाणी, रस्ते,वीज पुरवली , गटारे बांधली. कुसगाव हे लोणावळ्याचे जवळ असल्याने आमच्याकडे कोणत्याही कामासाठी या आम्ही आपला शब्द पाळू. जवळच औंढे , औंढोली , डोंगरगाव यांनाही काही अडचण असल्यास मदत करू. वरसोली,कुणेनामा यांना पाणीपुरवठ्याबाबत मदत केली. आपण कचरा चार भागात वर्गीकरण करून आणल्यास आमच्या कचरा डेपोत त्यावर प्रक्रिया करता येईल.आपण पंतप्रधान मोदीजींनी झाडू हातात घेऊन स्वच्छतेचा संदेश दिला. गावोगाव स्पर्धा झाल्या .आम्ही लोकांच्या सहयोगाने सलग तीन वर्षे दुसरा क्रमांक मिळवून चाळीस कोटीचे बक्षीस जिंकले. सुमारे शंभर कोटीची कामे पाच वर्षात केली.नव्वद टक्के रस्ते केले.जिल्हा ग्रामिण रूग्णलयाचे कामासाठी जागा दिली. रेल्वेवरील पुलासाठी सुधीर मनगंटीवार यांनी निधी दिला.बावीस कोटीचा तो पूल, तसेच अनैकानेक कामे केली,असे नगराध्यक्षा श्रीमती जाधव म्हणाल्या .

 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी म्हणाले, कुसगावच्या सरपंच अश्विनी गुंड,उपसरपंच सूरज केदारी तसेच सर्व सदस्य अशी चांगली टीम आपल्याला लाभली आहे. आपण आमच्याकडे कधीही कोणत्याही प्रश्नासाठी या आम्ही तत्पर राहून काम करून देवू.आमचेही काही मतदार येथे आहेत. आपण स्वच्छता पाळा. रोगराई टाळा..घाणीवर मच्छर बसून ते आपल्याला चावतात. मग विविध आजार होतात म्हणून आपण पंतप्रधान मोदी यांनी सांगितले ते स्वच्छतेचे काम केले पाहिजे.

यावेळी माजी जिल्हापरिषद सदस्य दत्ताभाऊ गुंड , लोणावळ्याचे माजी नगरसेवक विशाल पाडाळे, शिवसेना उपतालुकाप्रमुख गबळू गुंड, क्रांतीनगरमधील सदस्य गणेश गुंजाळ, उपसरपंच सूरजभाऊ केदारी , स्थानिक कार्यकर्ते राजू काजळे आणि कृषिकेश ठुले यांनी मनोगत व्यक्त केली.

यावेळी लोणावळ्याचे नगरसेवक देविदास कडु, कुसगावच्या सरपंच अश्विनी ज्ञानेश्वर गुंड, संजय गुंड सदस्या वर्षा कडू, माजी सदस्या जनाबाई भालेकर, माजी सदस्य व तंटामुक्त अध्यक्ष शंकर गाडे, माजी उपसरपंच आनंता घुले, चैतन्य पतसंस्था संस्थापक मारूती साठे, सदस्य राजेश काटकर, सदस्या शैला मोरे, फसीन मज्जीत शेख, मंदाकिनी झगडे, ग्रामस्थ वामन भालेकर, राम ठोंबरे, माजी आविनाश गुंड, उद्योजक शशीकांत गाडे , ज्ञानेश्वर गुंड,मज्जीत शेख , मधुकर कडू, माजी सदस्य दिलीप उंबरकर आणि युवक कार्यकर्ते किसन गुंड, कामगारनेते दत्ताञेय केदारी आदी उपस्थित होते.

यावेळी उपसरपंच सूरज केदारी म्हणाले , सर्वात पहिला ठराव क्रांतीनगरमधील पाण्याच्या करीता घेतला.वचनपूर्ती केली. अडीच किलोमीटर जलवाहिनी येथे फिरवली आहे.

विशाल पाडाळे म्हणाले, हा लोणावळा नगरीचा छोटा भाऊ आहे.येथील पाणी समस्या सुटण्यास सर्व नगरसेवकांचा सहभाग आहे.

दत्ताभाऊ गुंड म्हणाले, चांगल्या विचाराने सर्व एकञ आले आहेत. सतरा उमेदवार उभे केले त्यात दहा विजयी झाल्याने आज आम्ही सत्तेवर आहोत म्हणून आज क्रांतीनगरमधील लोकांना पाणी आले.

उपतालुकाप्रमुख गबळू ठोंबरे म्हणाले , दहा वर्षे मी सदस्य असताना चांगले सरपंच , उपसरपंच लाभले असते ,तर येथील लोकांना पाणी मिळाले असते.आश्विनी गुंड व सूरज केदारी यांचे सहयोगाने यावेळी कुसगाव विकासाचे माॕडेल बनवू .

प्रमुख पाहुण्यांचा यावेळी सरपंच व उपसरपंच आणि मान्यवरांचे हस्ते शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. प्रास्तविक उपसरपंच केदारी यांनी केले. सूञसंचालन किसन गुंड यांनी केले.आभार सरपंच आश्विनी गुंड यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!