आरोग्य व शिक्षण

एकांतवासात जातोय! अमोल कोल्हे यांच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चांना उधाण

Spread the love

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी एकांतवासात जातोय अशी पोस्ट सोशल मीडियावर केली आहे.ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. कोल्हे यांनी काही निर्णयाचा फेरविचार करणार असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे. त्यांच्या फेसबुक पोस्टमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्ट मध्ये सिंहावलोकनाची वेळ. गेल्या काही दिवसात, महिन्यात, वर्षात बेभान होऊन धावत राहिलो. काही टोकाचे निर्णय घेतले. अनपेक्षित पावलेही उचलली. पण हे सगळं करताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताण-तणाव यामुळे जरा थकवा आला. थोडा शारीरिक बराचसा मानसिक. शारीरिक थकवा निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हव थोड चिंतन असे म्हटले आहे.

त्याचबरोबर घेतलेल्या निर्णयांचा विचार आणि कदाचित फेरविचार त्यासाठी एकांतवासात जातोय. काही काळ संपर्क होणार नाही. पुन्हा लवकर भेटू नव्या जोमाने नव्या जोशाने असं सूचक वक्तव्य कोल्हे यांनी केले आहे. या पोस्टमध्ये अमोल कोल्हे यांनी फक्त चिंतनासाठी जातोय चिंतन शिबिरांसाठी नाही अशी टिप्पणीही केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!