आरोग्य व शिक्षण

विद्यार्थी दिनाचे औचित्य साधून पिंपोळोली येथे विविध कार्यक्राचे आयोजन;अनेक मान्यवरांची उपस्थिती

Spread the love

कार्ला : एकता जनहितसेवा संस्था व माय रमाई फांउडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने व ग्रुप ग्रामपंचायत ताजे,पिंपळोली,पाथरगाव, जि.प.प्राथमिक शाळा पिंपळोली यांच्या सहकार्याने पिंपळोली येथे 7 नोव्हेंबर विद्यार्थी दिनाचे औचित्य साधुन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

त्या कार्यक्रमाचा बक्षिस वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते रविवार (दि 7 नोव्हेंबर)रोजी सायंकाळी 5 वाजता संपन्न झाला.

यावेळी  रांगोळी, चित्रकला ,निबंध, वकृत्व , हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये खास करुन महिलांसाठी एक खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ” प्रथम क्रमांक एक पैठणी हा कार्यक्रम घेण्यात आला. त्याला महिला वर्गाचा उदंड असा प्रतिसाद मिळाला.

या स्पर्धेत  प्रथम क्रमांक मंदा दगडु लोखंडे द्वितिय क्रमांक भारती अरुण वायभट आणि तृतीय क्रमांक कविता मारुती पिंपळे यांना मिळाला.खास आकर्षक बक्षिस ठेवण्यात आले होते. यामध्ये पैठणीचा मान मंदा दगडु लोखंडे यांना मिळाला. यावेळी कोरोना काळामध्ये उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या टिमचा  सन्मान करण्यात आला  स्वप्ना संतोष बोंबले,मंगल नवनाथ कुटे,पिंकीताई बांगर या अशा स्वयंसेविकांचा अंगणवाडी सेविका मुक्ताबाई बोंबले,वत्सला गुजर, श्रीकांत दळवी, योगेश सोमवंशी, ग्रामपंचायत कर्मचारी संभाजी गायकवाड यांना कोविड योध्दा म्हणुन गौरविण्यात आले.

तसेच मावळ तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्रात जि.प,प्राथमिक शाळा पिंपळोली अव्वल स्थानी ठेवल्यामुळे शाळेचे मुख्यध्यापक श्रीकांत दळवी यांना भरीव कामगिरी केल्यामुळे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. सोमवंशी  यांचाही या ठिकाणी गौरव करण्यात आला. आदर्श शिक्षिका म्हणुन बारावकर मॕडम यांना ही सन्मानित करण्यात आले. नुकतिच ज्यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड झाली असे शिवसेनेचे उपविभाग प्रमुख सिने अभिनेते संतोष भैरु बोंबले यांचा या ठिकाणी त्यांच्या केलेल्या कार्याबद्दल गौरव करण्यात आला व गावातील प्रथम वकिल शंकर नारायण पिंपळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल श्रुती रामदास पिंपळे,अपेक्षा सुनिल गुजर,अक्षदा आनंद सुतार तसेच युवाचित्रकार रवी दत्तात्रय केदारी यांचा या ठिकाणी सन्मान करण्याता आला.त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांचा बक्षिस समारंभ संपन्न झाला.

यावेळी प्रथम, द्वितीय तृतिय ,पारितोषक देण्यात आले कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक आत्मविश्वास आणि जोश निर्माण झाला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन सुर्यकांतजी वाघमारे (लो.न.पा.मा.नगराध्यक्ष,आरपीआय पु.जि.प्रमुख) मावळच्या सभापती ज्योतीताई शिंदे,एकता जनसेवा संघाचे अध्यक्ष सुनीलभाऊ चौरे, व मावळच्या महिलाआघाडी प्रमुख सौ.सायली ताई जितेंद्र बोत्रे, महाराष्ट्र राज्याचे माहिती अधिकारी प्रमुख नितीनजी यादव साहेब ,पनवेल रायगडचे जिल्हाध्यक्ष भिमराव चौरे माय रमाई फाउंडेशनचे अध्यक्ष अॕ.अमरशेठ चौरे, आरपीआयचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेरावसाहेब, यांची प्रमुख उपस्थिती लाभली

यावेळी गावच्या सरपंच निलमताई सुतार ,रेशमा गणेश गायकवाड (वि,सदस्या) सिध्दार्थभाऊ चौरे(वि.सदस्य) सचिनशेठ केदारी (वि.उपसरपंच), कुंदाताई बालगुडे (वि.सदस्या) रामचंद्र आप्पा पिंपळे(मा.सरपंच),सोपान पिंपळे (चेअरमन),बाळासाहेब सुतार(मा.सदस्य) नंदाताई चौरे( मा.उपसरपंच) सारिका लक्ष्मण पिंपळे(मा.सदस्या) बाळासाहेब अप्पा पिंपळे ( मा.ग्रा.पं सदस्य),अजयजी भवार(युवानेते) ,प्रा.कमलेश गुजर, प्रा.संदिप बोंबले, मच्छिंद्र गुजर (माहिती अधिकारी) प्रा.मानकु बोंबले ,लक्ष्मण पिंपळे(शि.स.अध्यक्ष ) सारिकाताई राजु पिंपळे व पो.पाटिल दिपाली बोंबले अंकुशशेठ चौरे,सबा पिंपळे,अनिल घोडके ई.मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक सिध्दार्थ शेठ चौरे(आरपीआय नाणेमावळ अध्यक्ष वि.सदस्य) ),गणेशशेठ गायकवाड(युवानेतृत्व वि.सदस्य) सुनिलशेठ गुजर (माहिती अधिकारी प्रमुख मावळ)संदिपशेठ चौरे (मा.उपसरपंच उद्योजक) सुनीलशेठ चौरे,(आरपीआय अध्यक्ष पिंपळोली) संतोषशेठ बोंबले(शिवसेना उपविभागप्रमुख सिनेनाट्य अभिनेते तं.मु.अध्यक्ष) मा.श्री. सिताराम सुतार(वि. सरपंच युवानेते) यांनी केले.

सुत्रसंचालन सुनिलशेठ गुजर यांनी केले व आभार सिध्दार्थशेठ चौरे यांनी मानले.यावेळी सायलीताई बोत्रे यांनी आपल्या मनोगतातुन आयोजकांचे व गावातील महिला वर्गाचे तोंडभरुन कौतुक केले. मावळच्या सभापती ज्योतिताई शिंदे यांनी आपले मोलाचे मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्याचे आरटीआय प्रमुख नितीन यादव सर यांनी आपल्या खास शैलीतुन गावाला माहिती अधिकाराचे महत्व पटवुन देण्याचे काम केले. मा.उमेश सणस सचिव माहिती अधिकार एकता जनसेवासंघाचे अध्यक्ष सुनिलभाऊ चौरे,माय रमाईफांऊडेशनचे अमरजी चौरे लक्ष्मण भालेराव मावळ तालुका अध्यक्ष आरपीआय या सर्वांनी आपल्या मनोगतातुन बाबासाहेब आंबेडकर व 7 नोव्हेंबर या दिनाचे महत्व सर्वांना पटवुन सांगितले.

सिध्दार्थ शेठ चौरे गणेशशेठ गायकवाड यांच्या प्रयत्नांमुळे व सतत नवीन काहीतरी करण्याच्या धोरणांमुळे ग्रामस्थ गावकरी वर्गातुन यांना खुप मोलाचा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे. एक प्रकारे नवीन उर्जा नवचैतन्य देण्याचे काम या दोन्ही व्यक्तींकडुन होत आहे. महिला वर्ग असो नाहीतर युवावर्ग या यांच्या कार्यामुळे खुप समाधानी वाटत आहे असे वारंवर उल्लेख ग्रामस्थांमधुन उमटत आहे. आम्ही सदैव गावच्या आनंदासाठी विकासासाठी स्वप्न पुर्ण करण्यासाठी सदैव पुढे असु असे प्रतिपादन सिध्दार्थभाऊ चौरे, गणेशशेठ गायकवाड, सिताराम सुतार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!