आरोग्य व शिक्षण

थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथीनिमित्त साक्षरता वर्ग

Spread the love

कार्ला: थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुण्यतिथीनिमित्त कार्ला येथील आदिवासी पाड्यावर कै संजय (आवानाना)हुलावळे प्रतिष्ठानच्या वतीने साक्षरता वर्ग सुरू करण्यात आले.

थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे आदिवासी बांधवांच्या हस्ते पुजन करून या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

दररोज सायंकाळी एक तास आदिवासी पाड्यावरील मुलांचे तसेच स्वइच्छेने सहभागी होऊ घातलेल्या आदिवासी बांधवांचे साक्षरता वर्ग घेतले जाणार असून जी मुले शाळेत जातात त्यांची दुबार उजळणी झाल्यास त्यांच्या बौध्दीक क्षमतेत मोठी सुधारणा होणार आहे. या उपक्रमाबद्दल आदिवासी बांधवांनी समाधान व्यक्त केले.

तसेच स्वच्छता ,स्वःताचे अधिकार,या बाबतही त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब हुलावळे,सचिव वत्सला हुलावळे,प्रतिष्ठानचे सदस्य अजय मोरे,राजु हुलावळे,रमेश जाधव,अक्षय हुलावळे,शब्बीर मणियार,आकाश हुलावळे,संतोष मल्हारी हुलावळे,साहिल हुलावळे,शिवानी पात्रा व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!