आरोग्य व शिक्षण

कामशेतमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

Spread the love

कामशेत :  येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान दिनाचे औचित्य साधून कामशेत शहरात तरुण युवकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फाउंडेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली.

कामशेत शहरातील तरुण युवक एकत्र येऊन सामाजिक , शैक्षणिक सामाजिक उपक्रमासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फाउंडेशनची स्थापना केली.या संस्थेचे उद्घाटन  शिवाजी मोरे माजी न्यायाधीश यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

ज्ञानेश्‍वर साबळे, (माजी पोलीस अधिकारी ) मधुकर भालेराव ( भारतीय बौद्ध महासभा सचिव, महाराष्ट्र राज्य ) डॉ.दीपक जाधव ,भगवान रोकडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख वक्त्यांनी आपल्या मनोगतात युवकांना मार्गदर्शन केले .

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय वाघमारे, प्रवीण अहिरे, महिंद्र वंजारी, सुभाष गायकवाड ,मिलिंद घोडके ,राजू गायकवाड, कुणाल ओव्हाळ, संजय कुलकर्णी ,किशोर ओव्हाळ, मिलिंद वंजारी ,सुरेंद्र घोडके ,संतोष गायकवाड, आदेश वंजारी ,किरण वंजारी, जया अहिरे ,सुचिता वंजारी, सुशील नाईक नवरे व मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रवीण अहिरे व आभार प्रदर्शन किसन आहिरे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!