आरोग्य व शिक्षण

मनसेच्या सहकार अध्यक्षपदी लक्ष्मण पिंपळे यांची निवड

Spread the love

कार्ला : मावळ तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहकार अध्यक्षपदी लक्ष्मण पिंपळे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे सहकार सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने दिलीप (बापु)धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवडीचे पत्र पिंपळे यांना देण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना प्रदेशाध्यक्ष व मनसे नेते मा.श्री.दिलीप बापू धोत्रे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या मावळ तालुकाध्यक्षपदी लक्ष्मण बाळासाहेब पिंपळे यांची पुणे येथील मनसे कार्यालयात नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.

नियुक्ती पत्र देते वेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ॲड. गणेश आप्पा सातपुते,उपाध्यक्ष ॲड.रुपालीताई पाटील, जिल्हाध्यक्ष मा.श्री.ॲड.रवींद्र गारुडकर उपस्थित होते व यावेळी मावळमधून निरंजन चव्हाण,अशोक कुटे,संतोष दळवी विजय भानूसघरे आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!