आरोग्य व शिक्षण

विद्या प्रसारिणी सभेचा ९९ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

Spread the love

लोणावळा : आज (दि.३डिसेंबर ) रोजी विद्या प्रसारिणी सभा, पुणे यांच्या ९९ व्या वर्धापन दिनानिमित्त व्ही.पी.एस. हायस्कूल लोणावळाच्या प्रकाश हाॅलमध्ये वर्धापन दिन साजरा करण्यांत आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष – वि.प्र.सभेचे कार्यवाह मा. डाॅ. सतिष गवळी हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि रामानंद चॅरीटेबल ट्रस्ट मुंबई यांचे संचालक श्री. कुकरेजा, (अध्यक्ष) विनोद आगरवाल, कुकु कोहली, कॅप्टन मेहता, वरसोली गावचे माजी सरपंच राजू खांडेभरड, तसेच प्राचार्य रामदास दरेकर, वि.प्र.सभेचे सदस्य श्री. भुरट, अ.शं.मेहता, धिरुभाई टेलर, अॅड. संदीप आगरवाल व सर्व विद्या शाखांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये गुणवंत शिक्षक, आदर्श शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,आदर्श प्रकल्प, सेवा निवृत्त कर्मचारी यांचा सन्मान करण्यांत आला.
यावेळी व्ही.पी.एस. आर्टस, सायन्स अॅण्ड काॅमर्स महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. चंद्रशेखर भगत, मनिषा जरग, सुरेखा आहिरे, मल्लिकार्जून कल्याणकस्तुरे, प्रियदर्शनी मंदार आंबेकर, आरती श्रीकांत कदम यांना शाल,श्रीफळ, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यांत आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुलकर्णी ,प्रास्ताविक ज्येष्ठ लिपीक भगवान आंबेकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन जाधव मॅडम यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!