आरोग्य व शिक्षण

मळवली बोरज रस्त्याची दुरावस्था;नागरीकांना मणक्याच्या आजाराची भिती,तर वाहनधारक त्रस्त

Spread the love

कार्ला : मळवली बोरज रस्त्याची अंत्यत दुरावस्था झाली असून,या रस्त्याने दररोज दुचाकीवर येजा करणाय्रा वाहनधारकांना मणक्याच्या आजाराची भिती सतावत आहे. तसेच जागोजागी पडलेल्या खड्या मुळे वाहने सतत आदळत असल्याने मणक्याच्या आजाराच्या भिती बरोबर वाहने नादुरुस्त होण्याचीही भिती सतावत आहे.

मळवली बोरज रस्त्याने  मळवली, बोरज, ताजे, पिंपळोली,पाटण, या गावातील नागरीक ये – जा करतात.तसेच मळवली बोरज रस्त्याच्या बाजुला अनेक बंगले धारक,सोसायट्या,हॅबिटेट घरकुल,असल्याने हा रस्ता सतत वर्दळीचा आहे. कित्येक वर्षाची रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी येथील नागरिकांची आहे. पण या रस्त्याकडे कोणाकडे लक्ष दयाला वेळ नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!