आरोग्य व शिक्षण

माळवाडीत ऊस तोडणी कामगारांना दिसला वाघ? वनविभागाकडून तपास सुरु

Spread the love

तळेगाव : तळेगाव दाभाडे शहरालगत माळवाडी गावच्या हद्दीत वाघ दिसल्याचा दावा ऊस तोडणी कामगारांनी केला आहे. काल शनिवार (दि. 11 डिसेंबर) रोजी रात्री 8 च्या सुमारास चार कामगार शेतात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत ऊस भरत असताना वाघ दिसल्याचा दावा ऊस तोडणी कामगारांनी केला.

रात्री अंधारात दिसलेला प्राणी वाघ होता आणि तो आमच्या दिशेने चाल करून येत होता अशी माहिती ऊस तोडणी कामगार विकास गायकवाड यांनी दिली.

या घटनेची माहिती मिळताच वनरक्षक निगडे भारती भुजबळ, वनमजूर थरकुडे आणि वन्यजीव रक्षक संस्थेच्या सभासदांनी घटनास्थळी भेट दिली. आज सकाळी पुन्हा एकदा परिसराची पाहणी केली असता काही पावलांचे ठसे मिळाले आहेत. परंतु ते बिबट्याचे असतील असे खात्रीशीरपणे सांगता येत नाही अशी माहिती वन्यजीव रक्षक संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी दिली.

सदर प्राणी तरस असण्याची शक्यता असून याबाबत तपास सुरू आहे. गावकऱ्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!