आरोग्य व शिक्षण

रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसीच्या वतीने दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन

Spread the love

तळेगाव: रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसी व जहांगीर हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी क्लब तळेगाव एम आय डी सी चे सर्व सदस्य त्यांचे कुटुंबीय तसेच श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर यांचे दंतचिकित्सा शिबिर आयोजित केले होते.

याप्रसंगी रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसी ही संस्था आरोग्य पथक व वर्धक अशा कार्यक्रमाचे नेहमीच नियोजन करते.तसेच प्रत्येकाने आरोग्याला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे असे मत संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी व्यक्त केले.

या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसी चे संस्थापक व मार्गदर्शक संतोष खांडगे विद्यमान अध्यक्षा सुमती निलवे,प्रवीण भोसले जहांगीर हॉस्पिटल येथील डॉ. मीरा शहा, डॉ. नॅन्सी महाजन. जहांगीर हॉस्पिटलचे सेलचे उपाध्यक्ष गितेश छत्रिय, तसेच रो.विल्सेन सालेर,मिलिंद शेलार सर,विलास टकले,  सचिन कोळवणकर, राहुल खळदे,  दशरथ जांभूळकर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अध्यक्षा  सुमती निलवे रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसी ही संस्था रक्तदान नेत्रचिकित्सा दंतचिकित्सा यासारखे उपक्रम नेहमीच राबवत असते .सौंदर्य खुलवण्यासाठी दातांची अनन्यसाधारण महत्त्व आहे व म्हणूनच दंतचिकित्साचे प्रयोजन केले आहे असे विशद केले.

जहांगीर हॉस्पिटल सीईओ डॉक्टर नीरा शहा यांचा स्वागतपर सत्कार सुमती निलवे यांनी केला.डॉ.नॅन्सी महाजन यांचा स्वागत पर सत्कार सचिव  प्रवीण भोसले यांच्या हस्ते तर इतर मान्यवरांचा सत्कार उपस्थित सन्माननीय रोटेरियन यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी उपस्थितांना दाताची निगा कशी राखावी दातांना होणारे विकार त्या संबंधित असणाऱ्या शल्यचिकित्सा या सर्व बाबींची माहिती स्लाईड शो द्वारे डॉक्टर नॅन्सी महाजन यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये दिली. स्लाईड शो नंतर उपस्थित सर्वांचे डिजिटल कॅमेरा द्वारे बोरवेल स्कॅनिंग करून चिकित्सा करण्यात आली. तसेच व्याधीचे निदान करून उपचार देखील सुचवण्यात आले‌.

या शिबिराचा रोटरी कुटुंबीय तसेच स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर असे मिळून 125 जणांनी लाभ घेतला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका विजय माला गायकवाड मॅडम यांनी केले. तर आभार विल्सन सालेर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!