आरोग्य व शिक्षण

वेहेरगांव दहिवली ग्रूपग्रामपंचायतीची कचरा मुक्ती अभियाना संदर्भात पंचायत समितीच्या सभापतींची भेट

Spread the love

लोणावळा :  वेहेरगावच्या कचरा समस्येचे निराकरण करण्यासाठी सरपंच व सदस्यांनी पंचायत समिती सभापती सौ.ज्योतीताई शिंदे यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली.

यावेळी वेहेरगाव दहिवली ग्रूपग्रामपंचायतचेवतीने सरपंच देवकर , सदस्य राजू देवकर , अनिल गायवाड , उद्योजक संदिप देवकर , सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड यांनी चर्चा करून ग्रामपंचायतीच्या कचरामुक्तीसाठी घंटागाडीची मागणी केली.

तसेच कचराडेपो कुठे जागा निवडावी , कर्मचारी नेमणूक आदी विषयाचा साधकबाधक विचारविनिमय करून प्रत्येक दुकानदारांना कचराडबा देण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेवून उपाययोजना करण्याचे या चर्चेत ठरले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!