आरोग्य व शिक्षण

भाजे गावात श्री दत्तजयंती उत्सवात श्रीची पालखी मिरवणूक , आॕर्केस्ट्रा आणि कुस्त्यांचा आखाडा संपन्न

Spread the love

लोणावळा : भाजे गावात श्री दत्तजयंती उत्सवात श्रीची पालखी मिरवणूक , आॕर्केस्ट्रा आणि कुस्त्यांचा आखाडा संपन्न झाला.

कोरोनाच्या लाटेमुळे अनेक महिने लाॕकडाऊन चा काळ होता. तिसरी लाट किंवा ओमायक्राॕन चे संकट दाराशी घोंगावत आसताना भाजे गावात यावर्षो सालाबादप्रमाणे श्री दत्तजयंती उत्सवात ता.१८ रोजी श्री दत्तजयंती निमित्ताने श्रीचा अभिषेक मान्यवरांचे हस्ते झाला. सायंकाळी साडेपाच ते साडेसहा श्री विठ्ठल मंदिरात हरिपाठ व साडेसहा ते साडेसात ह.भ.प.नाथामहाराज मोरे (शिलाटणे ) यांचे प्रवचन झाले.

सायंकाळी श्री च्या पादुका व मुर्तींची पालखीतून बोरज येथील श्री हनुमान ढोल पथकाचे साथीने ढोल ताशांच्या तालात श्री दत्तमंदिरा पर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. या श्री दत्तमंदिरात श्री दत्तजन्माचा पाळणा झाला.मराठी वाद्यवृंदाचा कार्यक्रम झाला.तसेच महाप्रसाद वाटप करण्यात आला.त्याचा शेकडो ग्रामस्थ , महिला,मुले आणि भाविक यांनी लाभ घेतला.

राञी साडेआठ ते बारा पर्यत अशी आमुची माय मराठी , हा आॕर्केस्ट्रा झाला. ता.१९ रोजी सायंकाळी चार ते आठ पर्यत नामवंत पैलवान यांचा कुस्त्यांचा आखाडा झाला. आनेक तालमीमधील गावोगाव चे पैलवान उपस्थित होते. यावेळी पंचक्रोशितील मान्यवर विविध पक्षाचे पुढारी , तसेच कुस्ती प्रेमी नागरिकांची कुस्त्यांचा आखाडा पाहण्यासाठी गर्दी झालेली होती.

सुमारे पंचवीस ते सव्वीस लोक त्यात काही तरूण , महिला यांचा कोरोनाच्या आजाराने मृत्यू झालेला असताना ज्यांचे घरातील कुणी जिवाभावाची माणसे गेली, त्यांचे घरी गोड धोड शिजले; तर काही घरी चिकन , मटनावर पाहुण्या मंडळींनी ताव मारला. पंचक्रोशितील जञा , याञा , उरूस चालू झाले असून या ठिकाणी गर्दी होत आहे. अनेक लोक मास्क चा वापर करीत नसल्यामुळे कोरोनाचा धोका संपलेला नाही ,असे म्हणण्याची वेळ आता उत्सव , याञा ,जञा यांना परवानगी देताना पोलिस प्रशासन यांचेवर जबाबदारी राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!