आरोग्य व शिक्षण

मासळीच्या किमतीत वाढ होणार !

डीझेल अभावी कोकण किनारपट्टीवरील 95% नौका धक्क्याला 

Spread the love

मुंबई  : डिझेल अभावी कोकण किनारपट्टीवरील 95 टक्के यांत्रिकी नौका गेल्या आठवडाभरापासून किनाऱ्यावर लागल्या आहेत. यामुळे मासळीच्या किमतीत वाढ होऊन मासळी महागणार आहे.

कोकणातील 170 मच्छिमार संस्थांना मत्स्य विभागाकडून दरवर्षी डिझेल उपलब्ध करून दिले जाते. एप्रिल ते मार्च या आर्थिक वर्षात तीन ते चार टप्प्यांमध्ये डिझेलचे वितरण केले जाते. सध्या मार्चपर्यंत 40 टक्के कोटा शिल्लक असतानाही मत्स्य विभागाने डिसेंबर 2021 मध्ये वितरीत केलेला 12 टक्के कोटा जानेवारी 2022 मध्ये वितरित केल्याचे दाखविले आहे. सध्या 28 टक्के कोटा शिल्लक आहे. पण मत्स्य विभागाने नौकांसाठी डिझेल देणे थांबवले आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास संधे यांनी दिली आहे.

खुल्या बाजारातून नौकांना आवश्यक तेवढे डिझेल मिळत नाही. त्यामुळे जानेवारीपासून नौका समुद्रात गेलेल्या नाहीत या पार्श्‍वभूमीवर मासळीच्या किमतीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!