आरोग्य व शिक्षण

मकर संक्रांत निमित्ताने गावोगावी नंदीबैलवाले नागरिकांच्या सेवेत

Spread the love

लोणावळा : मकरसंक्रांतीचा सण नंदीबैलाला घेवून गावोगावी खेळ दाखवून लोकांना भूतकाळ व भविष्यात काय होणार हे सांगून पोट भरणारे नंदीबैलवाले ग्रामिण भागात फिरताना दिसले.

तुमचे नशिबात अमुक तमूक आहे. घरातील लोक , गावातील लोक मान देत नसले तरी बाहेर तुमचे वजन आहे. तुमच्या हातात लक्ष्मी आहे,पण टिकत नाही..साडेसाती मागे लागली आहे , थोडी आडचण आहे. नंदीबैलाला , शंभू महादेवाच्या वाहनाला खाऊ घाला..वारभर कपडा , वैरण पाणी यासाठी खर्च करा ! ! अशी आर्त साद घालणारे नंदीबैलाला होकार , नकार द्यायला लावतात.

लहान मुलाच्या पोटावर , तसेच मोठ्या माणसाच्या पोटावर,कपाळावर पाय ठेवायला लावणारे नंदी बैल माञ ऐटीत सारे लीलया करतात. ! ! या भटकंती करणाऱ्या लोकांसाठी शासनाने काहीतरी योजना आखली पाहिजे.! त्यांना अनुदान दिले पाहिजे.लोकांची सणानिमित्त करमणूक होते.या लोकांना ही पोटापाण्याचा व्यवसाय झाल्याने तात्पुरती सोय होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!