आरोग्य व शिक्षण

लोणावळ्यातील सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ नायडू यांचे निधन

Spread the love

लोणावळा : येथील माहिती आधिकार कार्यकर्ते (आर .टी. आय ) जगन्नाथ नरसिंह नायडू (वय-८३ ,रा-भांगरवाडी , लोणावळा ) यांचे नुकतेच अल्पशः आजाराने निधन झाले.त्यांचे पश्चात पत्नी , दोन विवाहित मुलगे , सुना , नातवंडे आसा परिवार आहे.

लोणावळ्यातील नगरपरिषदेचे नगराध्यक्षा यांचे वाहनावरील चालक विजय जगन्नाथ नायडू हे त्यांचे सुपुञ होत. कै.नायडू यांचा तिसरा मुलगा दीड वर्षापूर्वी अतिवृष्टीत भिंत अंगावर कोसळून मरण पावला होता.

कै.नायडू यांनी मागणी व पाठपुरावा केल्यामुळे लोणावळा नगरपरिषदेच्या वाचनालयास स्वातंञ्यवीर साने गुरूजी यांचे नाव नगरपरिषदेने दिले आहे. रेल्वेकामगार रहिवासी भाग आगवालाचाळ येथे रेल्वेकडून मुझियम उभारल्यास लोणावळ्याच्या पर्यटकांना आनंद घेता येईल , तसेच रेल्वे इन्स्टिट्यूटला हेरिटेज दर्जा देण्याची मागणी त्यांचेकडून करण्यात आली होती. त्यांनी माहिती आधिकार कायदा वापरून आनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यात यश मिळवले. एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणूनही ते परिचित होते.त्यांनी भांगरवाडी प्रभागात नगरसेवक पदासाठी निवडणूक लढून लोकांचा कल ओळखला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!