आरोग्य व शिक्षण

भांगरवाडी येथील पोलिस चौकी व लोहगड दर्शन उद्यानसमोर सीसीटीव्ही कॕमेरे धूळखात पडून

Spread the love

लोणावळा : भांगरवाडी येथील पोलिस चौकी व लोहगड दर्शन उद्यानसमोर सीसीटीव्ही कॕमेरे धूळखात पडून असल्याने भविष्यात निवडणुकीसाठी व गुन्यातील आरोपींना शोधण्यासाठी असलेला स्ञोत निकृष्ट व धूळखात पडल्याने लोणावळा नगरपरिषदेचे व लोणावळा शहर पोलिसांकडून हे सीसीटीव्ही कॕमेरे पुन्हा वापरात येतील का ? असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे.

लोणावळा शहर पोलिस स्टेशनला वरिष्ठ पोलिसनिरिक्षक बी.आर.पाटील यांनी पदभार घेतल्यानंतर त्यांचेकडून शहरात सीसीटीव्ही कॕमेरे भगवान महावीर चौकात तसेच भांगरवाडी येथील लोहगड उद्यानसमोर लावलेले होते. सामाजिक कार्यकर्ते यांचेकडून आर्थिक तरतूद करण्यात आल्यानंतर हे सीसीटीव्ही लावले होते.

या चौकाला स्वातंञ्यवीर सावरकर नामकरण नुकतेच माजी आमदार दिगंबरशेठ भेगडे यांचे हस्ते व माजी तत्कालीन नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांचे उपस्थितीत झाले होते. याबाबत भांगरवाडी पोलिस चौकीतील फौजदार यांना सीसीटीव्ही बाबत विचारणा केली असता ; तत्कालीन पोलिसनिरिक्षक बी.आर.पाटील यांचे काळात बसविलेल्या सीसीटीव्ही कॕमेरे हे महागडे असून या कॕमे-यांना सुस्थितीत ठेवण्यासाठी लोणावळा नगरपरिषद किंवा सामाजिक संस्थांचेकडून प्रयत्न व्हायला हवेत. काही महिन्यापूर्वी द्वारकामाई सोसायटी येथे गुन्हा घडल्या नंतर चोविस तासांमधे गुन्हेगार ट्रेस झाला , त्यामुळे पोलिसांना गुन्यातील आरोपींना शोधने सोपे जाते ,असे त्यांनी आवाज प्रतिनिधीशी बोलताना सांगितले . तीन सीसी टीव्ही कॕमेरे धूळखात पडून आसल्याने या परिसराला सुरक्षा कवच प्राप्त होण्यासाठी हे सीसीटीव्ही पुन्हा दुरूस्तीची गरज आहे ,असे पोलिस सुञांकडून सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!