आरोग्य व शिक्षण

वेहेरगावच्या आदर्श माता श्रीमती गजाबाई माने यांचे निधन

Spread the love

लोणावळा : वेहेरगावच्या आदर्श माता श्रीमती गजाबाई काशिराम माने (वय-९० ) यांचे वृध्दापकाळाने मंगळवारी ता.१८ राञी निधन झाले.

त्यांचे पश्चात तीन विवाहित मुलगे , एक विवाहित मुलगी , सुना , नातवंडे , पतवंडे , आसा परिवार आहे.

मावळ तालुक्यातील प्रसिद्ध गाडामालक वसंतराव काशिराम माने , उद्योजक बबनराव काशिराम माने आणि पांडुरंग काशिराम माने हे त्यांचे सुपुञ ;तर वेहेरगावच्या माजी सरपंच कल्पनाताई बबनराव माने या त्यांच्या स्नुषा होत

. कै.गजाबाई माने यांच्या पार्थिवावर आज सकाळी अकराच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमि , वेहेरगाव येथे शोकाकूल वातावरणात विविध क्षेत्रातील मान्यवरांचे उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मावळ तालुका बैलगाडा संघटना अध्यक्ष आण्णासाहेब भेगडे , पंढरपूर धर्मशाळा बांधकाम समितीचे अध्यक्ष माऊली मामा शिंदे , वेहेरगावचे कार्यकर्ते जितेंद्र बोञे , माजी सरपंच तानाजी पडवळ आणि मान्यवरांनी श्रध्दांजली वाहिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!