आरोग्य व शिक्षण

लोणावळा शिवसेनेचे सर्व नगरसेवक पक्षासोबत – राजेश खांडभोर 

Spread the love

लोणावळा : काही दिवसांपूर्वी लोणावळ्यात घडलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माध्यमात प्रसारित झालेल्या बातम्यांनुसार आमचे नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर नसून ते सर्व पक्षासोबत आहेत असा खुलासा शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेश खांडभोर व गटनेत्या शादान चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला.

माध्यमातील वृत्ताचे खंडन करत केवळ राजकीय स्वार्थापोटी या बातम्या काहींनी माध्यमांमध्ये पेरल्या असे ते यावेळी म्हणाले.

लोणावळ्यातील कॉंग्रेसच्या नाराज नगरसेवकांचा गट व शिवसेना तसेच सहयोगी पक्षातील नगरसेवक वडगाव मावळ येथील हॉटेल वर असताना मावळचे आमदार सुनील शेळके हे नगरसेवकांच्या भेटीसाठी आले होते. या भेटीचा चुकीचा अर्थ लावत लोणावळ्यातील सतरा नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. मात्र यात काडीमात्र तथ्य नसून आमचे सर्व नगरसेवक आमच्यासोबत आहेत असे खांडभोर म्हणाले.

लोणावळा नगरपरिषदेची निवडणूक  आम्ही पक्षाच्या चिन्हावर व विकासाच्या मुद्द्यावर लढवणार असल्याचे खांडभोर यांनी सांगितले. पर्यटन स्थळ म्हणून लोणावळ्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर,लोणावळा शहर प्रमुख बाळासाहेब फाटक, शिवसेना गटनेत्या शादान चौधरी, नगरसेवक शिवदास पिल्ले, माणिक मराठे, नितीन आगरवाल, कल्पना आखाडे,सिंधू परदेशी, तालुका समन्वयक अंकुश देशमुख, युवा सेना अध्यक्ष श्याम सुतार, महिला प्रमुख अनिता गोणते, मनीषा  भांगरे संजय भोईर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!