आरोग्य व शिक्षण

मोरेवस्ती,चिखली,घरकूल,म्हेत्रे वस्ती,साने चौक आदी भागात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची गस्त वाढवा – नेताजी काशिद

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना दिले निवेदन

Spread the love

पिंपरी  : पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तलयाच्या हद्दीतील चिखली पोलिस स्टेशन परिसरातील मोरे वस्ती,चिखली,घरकूल आदी भागात गुन्हेगारी वाढली असून यामध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत असल्याने या नागरी वस्ती मध्ये पोलिसांची गस्त सुरू करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख नेताजी काशीद यांनी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

यावेळी नेताजी काशीद यांनी सांगितले की, साने चौक,म्हेत्रे वस्ती,मोरे वस्ती या ठिकाणी महिलांची आणि तरुण मुलींची छेडछाड करण्याचे प्रकार सातत्याने घडत आहे.त्यामध्ये या ठिकाणी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात राहत असल्याने रात्री कामावरून घरी येताना मध्ये अडवून त्यांची रोकड आणि इतर मुद्देमाल बळजबरीने चोरी केला जात आहे.त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळी,संध्याकाळी या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवली पाहिजे असे निवेदनात नमूद केले आहे. यावेळी भोसरी विधानसभा शिवसेना शहर संघटक रावसाहेब थोरात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!