आरोग्य व शिक्षण

वरसोली ग्रामपंचायतीचे उपसरपंचपदी अरविंद बालगुडे बिनविरोध

Spread the love

लोणावळा : वरसोली ग्रामपंचायतीचे उपसरपंचपदी अरविंद ए. बालगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच रजनी कुटे यांनी ठरलेल्या कालावधीत पदाचा राजिनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी वरसोली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.सारिकाताई संजय खांडेभरड यांचे अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलावण्यात आली होती.या वेळी श्री.बालगुडे यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे सरपंचांनी जाहीर केले.

यावेळी सहाय्यक निवडणूक आधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी परमेश्वर पाटील यांनी काम पाहिले.

यावेळी सर्व ग्रामपंचायत सरपंच सौ.सारिका खांडेभरड , माजी सरपंच संजय खांडेभरड , माजी उपसरपंच केतन खांडेभरड , माजी उपसरपंच दत्ताञेय खांडेभरड , सदय्य विलास चौधरी , माजी सरपंच बबन खरात , सदस्या अरूणा खांडेभरड , सिता ठोंबरे , मीना शीद, रजनी कुटे आदी उपस्थित होते.

बालगुडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल काँग्रेसचे जेष्ट नेते चंद्रकांत सातकर, माजी पंचायत समिती सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम , संभाजी राक्षे, काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अॕड.खंडुजी तिकोणे , भाजपचे पदाधिकारी संभाजी येवले , अमोल केदारी , अर्जुन पाठारे , जितेंद्र बोञे, कार्लाचे माजी उपसरपंच प्रदिप हुलावळे , वेहेरगावचे माजी सरपंच दत्ताञेय पडवळ , विकास खांडेभरड , शाम येवले, सचिन येवले , तुळशीराम पिंगळे , भरत कोंडभर , नवनाथ कोंडभर , नवनाथ कडू , अरूण भानुसघरे , एकनाथ गायकवाड , हरिश पडवळ आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!