देश विदेश

तान्ह्यां लेकराची आजारपणाची झुंज…कुटुंबाला आता आर्थिक आधाराची ग

Spread the love

प्रथमेश क्षीरसागर-इस्लांंपूर प्रतिनिधी

इस्लामपूर दि. २० आपल्या तान्ह्यां लेकराची आजारपणाची झुंज… आणि त्यांच्या आई- वडीलांची मुलाच्या उपचारासाठी लागणा-या लाखो रुपये खर्चाची तरतूद करताना होणारी दमछाक पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. पण या कुटुंबाला आता आर्थिक आधाराची गरज आहे
. वाळवा तालुक्यातील कामेरी येथील संकेत सचिन पाटील यांचा १४ वर्षाचा चिमुकला ब्लड कॅन्सरला झुंज देतोय.मुलांच्या उपचारासाठी पैसे कुठून जमा करायचे ही चिंता पाटील कुटुंबियांना लागून राहिली आहे. येथील कर्मवीर शिक्षण संस्थेच्या आदर्श विद्यालयात इयत्ता नववीत संकेत शिकत असून वडील सचीन केरु पाटील हे शेती करतात घरची परिस्थिती गरिबीची आहे २०१८साली संकेत आजारी पडला आणि त्यातच त्याला ब्लड कॅन्सर झाल्याचे निदान झाले आई-वडिलांचे हातपाय गळटले मुलाला घेऊन दवाखान्यात घेऊन हे कुटुंब सैरावैरा पळत होते. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी १४लाख खर्च सांगितला. कसेतरी पैसे जमा केले आणि उपचार सुरू झाले त्यातून संकेत बरा झाला शाळेत जाऊ लागला पुन्हा या आजाराने तोंड वर काढले आता उपचारासाठी साडेबारा लाख रुपये खर्च येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले पुन्हा या संकटाला तोंड कसे द्यायचे पैसे कसे उभे करायचे हा प्रश्न आईबापांची पडला आहे..

अस्टर आधार हॉस्पिटल कोल्हापूर येथे सध्या संकेत वर उपचार चालू असून बोन मॅरो प्रत्यारोपण व केमोथेरपी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मदतीसाठी वडिलांनी आवाहन केले आहे. मुख्यमंत्री फंडातून एक लाख रुपयांचा धनादेश प्राप्त झाला आहे अनेक हात मदतीला धावून आले आहे मात्र रक्कम मोठी असल्याने ती जमविणे जिकीरिचे आहे उर्वरित रकमेसाठी सेवाभावी व दानशूर व्यक्तींनी Aster Aadhar hospital Kolhapur नांवे द्यावी असे आवाहन केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!