आरोग्य व शिक्षण

शेजार जेष्ठ नागरिक संघात डॉ. शाळिग्राम भंडारी यांचे व्याख्यान संपन्न

Spread the love

तळेगाव : येथील शेजारी ज्येष्ठ नागरिक संघात ज्येष्ठत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती या विषयावर डॉ. शाळीग्राम भंडारी यांचे व्याख्यान संपन्न झाले. शेजार ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या डॉ. भंडारी यांनी  तनामनाला जागं केलं. प्रसन्न मुद्रा,नम्रता, मधुर वाणी आणि सतत उद्योगशील असणं ही माणसाची उत्कटतेची लक्षण आहेत.स्वतःला स्वतःची ओळख झाली पाहिजे. स्वतःला कमी लेखू नये .तसेच नेहमी दातृत्वाची तयारी ठेवावी असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. दुःखाला कुरवाळत बसू नये म्हणजे जगण्याचा आनंद घेता येतो असे सांगताना त्यांनी शेरोशायरीचा कवितांचा सुभाषितांचा उल्लेख केला.

डॉ. भंडारी यांचे सहकारी विठ्ठल गोंधळेकर यांनी या कार्यक्रमात व्यायामाचा प्रकार म्हणून हास्याचे काही प्रयोग केले. व्याख्यानाला ज्येष्ठांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली.

यावेळी उमाकांत कुलकर्णी (अध्यक्ष) यांनी डॉक्टरांचा सत्कार केला. उर्मिला बासरकर (उपाध्यक्ष) यांनी समालोचन करून सर्वांचे आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!