आरोग्य व शिक्षण

रोटरी क्लब आॕफ तळेगाव MIDC व नागरे अॕक्सिडंट व जनरल हाॕस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर

Spread the love

तळेगाव : रविवार दि.१३ फेब्रुवारी रोजी मावळ तालुक्यातील अतिदुर्गम उधेवाडी व राजमाची गावात रोटरी क्लब आॕफ तळेगाव MIDC व नागरे अॕक्सिडंट ,जनरल हाॕस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाची गावातील १५० लोकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

यामध्ये प्रत्येक व्यक्तीची संपूर्ण मोफत शरीर तपासणी करून त्यांना असणाऱ्या व्याधींवर रो. डाॕ. नितीन नागरे व रो. डाॕ. सौ.सुरभी नागरे या दाम्पत्यांनी एकूण २५ हजारांची मोफत औषधे वाटप केली .या प्रोजेक्टचे प्रकल्प प्रमुख रो.विल्सन सालेर व रो.सचिन कोळवणकर यांनी छान नियोजन केले .

सर्व ग्रामस्थांना एकत्र आणण्याचे काम सांगाती सह्याद्री ग्रुपच्या सर्व सदस्यांनी केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्षा सुमती निलवे यांनी केले . या दुर्गम गावात दरवर्षी एक प्रोजेक्ट घेण्याचे आश्वासन क्लबचे संस्थापक अध्यक्ष रो.संतोष खांडगे यांनी दिले.यावेळी रो.मिलिंद शेलार, रो.लक्ष्मण मकर,रो.प्रविण भोसले रो.रुथ सालेर व सर्व सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!