आरोग्य व शिक्षण

रोटरी क्लब व पार्वती नेञालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेञतपासणी शिबीर

शिबिरात 150 जणांची नेत्रतपासणी व मोफत चष्मे वाटप

Spread the love

राजमाची : रविवार ( दि.१३फेब्रुवारी)  रोजी मावळ तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील उधेवाडी , राजमाची गावात रोटरी क्लब MIDC व पार्वती नेञालय तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत नेञतपासणी शिबीर घेण्यात आले.

यामध्ये गावातील १५० लोकांची नेञतपासणी पार्वती नेञालयाचे नेञतज्ञ रो.डाॕ.अशोक दाते व त्यांच्या टीमने केली .यामध्ये १० लोकांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे .त्या दहा लोकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया संपूर्ण मोफत करून देण्याचे आश्वासन रोटरी क्लब आॕफ तळेगाव MIDC चे संस्थापक अध्यक्ष रो. संतोष खांडगे यांनी दिले. बाकीच्या किरकोळ नेञ आजार असणाऱ्या लोकांना मोफत चष्मे व औषध वाटप करण्यात आले.

  • या प्रोजेक्टचे प्रोजेक्ट चेअरमन विल्सन सालेर,व सचिन कोळवणकर होते.यावेळी रोटरी MIDC चे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे,अध्यक्षा  सुमती निलवे,सेक्रेटरी प्रविण भोसले सर्व बोर्ड आॕफ डायरेक्टर्स ,मेंबर्स व सांगाती सह्याद्री ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी प्रास्तविक  सुमती निलवे यांनी तर आभार  लक्ष्मण मकर सर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!