आरोग्य व शिक्षण

महाशिवरात्रीनिमित्त भाऊ बहिणीची भेट

Spread the love

वडगाव : महाशिवरात्री उत्सवानिमित्ताने मावळ तालुक्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री पोटोबा महाराज व सांगवी येथील जाखमाता देवी या भाऊ बहिणींची भेट झाली.

देवस्थानचे शिवकालीन महादेव मंदिर विश्वस्त अरुण चव्हाण यांच्या हस्ते महादेवाचा अभिषेक संपन्न झाला. त्यानंतर सकाळी दहा वाजता पालखीचे आगमन झाल्यावर पोटोबा महाराज व जोगेश्वरी माता यांना इंद्रायणी स्नान झाल्यावर भजन, आरती,फराळ वाटप याचा आनंदी भाऊ बहीण भेटीचा सोहळा पार पडला.

यावेळी मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, विश्वस्त उपाध्यक्ष गणेश ढोरे, सचिव अनंता कुडे, किरण भिलारे, चंद्रकांत ढोरे, तुकाराम ढोरे, सुभाष जाधव, बबन भिलारे, सुदाम पगडे ,शंकर म्हाळसकर,विठ्ठल  ढोरे, मधुकर पानसरे,देवराम कुडे ,नारायण ढोरे, पंढरीनाथ भिलारे ,ज्ञानेश्वर म्हाळसकर,महादू खांदवे, कैलास खांदवे, रविंद्र तुमकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!