आरोग्य व शिक्षण

महिलांचा व्यक्तिमत्त्व विकास झाल्यास संपूर्ण कुटुंबाचा विकास : उपसरपंच एकनाथ गाडे

Spread the love

लोणावळा : महिलांचा व्यक्तिमत्व विकास झाल्यास संपूर्ण कुटूंबाचा विकास होण्यास मदत होते , मुले शिकतात. संपूर्ण कुटूंब साक्षर होते. प्रगती व्हायला वेळ लागत नाही, असे जांभूळचे उपसरपंच एकनाथ गाडे यांनी सांगितले . कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि आदर्श ग्रामपंचायत जांभूळ यांचा संयुक्त उपक्रम या गावात राबविण्यात येत आहे.

कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत जांभूळ यांच्या वतीने जांभूळ गावातील युवा वर्गासाठी विनामूल्य व्यक्तिमत्त्व विकास आणि स्पोकन इंग्लिश कोर्सची आज येथे सुरुवात करण्यात आली.ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातील तरतुदीतून या कार्यक्रमाची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

कोकण संस्थेच्या माध्यमातून गेली १० वर्षे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. आज जांभूळ ग्रामपंचायत हॉल मध्ये गावातील मान्यवर आणि महिलांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामसेविका सौ. कल्याणी लोखंडे आणि उपसरपंच श्री. एकनाथ गाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तृप्ती जांभुळकर, कल्पना भाकरे, कल्पना काकरे, रुपाली गायकवाड इत्यादी ग्रामपंचायत सदस्या उपस्थित होत्या. मोटीवेशनल शिक्षक बापू पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना ग्रामसेविका कल्याणी लोखंडे म्हणाल्या , गावचा विकास करायचा असेल; तर महिलांचा विकास करावा लागेल. त्यासाठी कौशल्य विकासावर आधारीत विविध उपक्रम राबवावे लागतील.

२१ व्या शतकातील स्त्रिया या हुशार आहेत आणि जांभूळ गावातील महिलांना अधिक सक्षम बनवण्यासाठी ग्रामपंचायत कायमच पुढाकार घेईल” असे गावचे उपसरपंच श्री एकनाथ गाडे म्हणाले.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन बापू माने यांनी तर ग्रामपंचायत सदस्या स्नेहल प्रशांत ओव्हाळ यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!