राज्यात एस. टी. जोरात ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल बिच्चारी रिकामी
लोणावळा : राज्यात एस टी जोरात ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल माञ बिच्चारी रिकामी धावत आहे. भाजपचे वतीने लोकलसेवा सुरू करावी.,दोन डोसवाले यांना लोकलसेवा खुली करावी अशी मागणी होत आहे.लोणावळा पुणे लोकलसेवा ही फक्त शासकीय प्रवाशांसाठी असल्यामुळे लोकल गाडी रिकामी धावत आहे. एस. टी. सेवा माञ भरभरून धावत पळत असून यामधून खचाखच भरलेले प्रवाशी यांचेमुळे राज्यसरकारची तिजोरी भरताना दिसत आहे.
एस.टी सेवेबरोबर पार्सल सेवाही जोरात –
एस.टी बस स्थानक लोणावळ्यातील बसेसची संख्या वाढल्यामुळे प्रवाशांची सोय तर होतच आहे ,परंतु फेरीवाले आणि पार्सलसेवेलाही चांगले दिवस आले आहेत. येथे नवीन फलक बसविल्याने पार्सल कार्यालयाने कात टाकली आहे. येथील कँटीन तसेच चिक्की दुकान फ्रूट दुकान यांनाही बरे दिवस आलेले पहायला मिळत आहेत.
राज्यात कोरोनाच्या कारनामुळे लोकलसेवा कमी प्रवाशांमुळे रेल्वेचे उत्पन्न माञ घटत आहे. लोकल सेवाही सर्वसामान्य लोकांना तसेच पञकार यांना चालु करावी अशी रेल्वे प्रवाशांची मागणी आहे