आरोग्य व शिक्षण

माजी नगराध्यक्ष जयवंत काऊर यांचे निधन 

Spread the love

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष जयवंत माधवराव काऊर (वय-७२) यांचे ता.६ रोजी अल्पशः आजाराने निधन झाले.

त्यांचे पश्चात पत्नी , दोन मुलगे, एक विवाहित मुलगी , सून ,नातवंडे असा परिवार आहे.

येथील श्री शिवाजी युवक मिञ मंडळाचे पदाधिकारी अमित जयवंत काऊर व आदित्य जयवंत काऊर हे त्यांचे सुपुञ होत.त्यांचे पार्थिवावर सोमवारी ता.७ रोजी सकाळी दहा वाजता कैलासनगर स्मशानभूमित शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी काँग्रेस आय चे प्रदेश सचिव निखिल कविश्वर , शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड , माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर ,श्रीधर पुजारी ,माजी नगराध्यक्ष मारूती तिकोणे कामगारनेते वसंतराव भांगरे , बबनराव फाटक, माजी उपनगराध्यक्षा आरोही तळेगावकर , माजी उपनगराध्यक्ष विलास बडेकर आदींनी यावेळी श्रध्दांजली वाहिली.

कै.जयवंतराव काऊर हे सुरूवातीला टेल्को कंपनीत नोकरीला होते.नंतर त्यांनी ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय केला . त्यांनी नगरसेवक म्हणून लोणावळा नगरपरिषद येथे १९८५ ते १९९० मधे निवडून गेल्यानंतर अनेक कार्यक्रम राबवून लोणावळ्याच्या विकासात भर घातली . सन १९८७ मधे नगराध्यक्ष झाल्यनंतर त्यांनी छञपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारणीसाठी तसेच इंद्रायणीनदी वरील पूल , रस्ते , पाणी योजना , शाळा यांचेसाठी महत्त्वाचे ठराव घेतले व भरीव कामगिरी केली. लोणावळा शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष तसेच हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष , श्री शिवाजी युवक मिञ मंडळाचे अध्यक्ष, श्री शिवजन्मोत्सव मंडळाचे अध्यक्ष ,नवमी भजनी मंडळाचे पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!