आरोग्य व शिक्षण

चिंचवडमध्ये ‘न्यू होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम उत्साहात साजरा

Spread the love

पिंपरी : कै. मनीषा भाऊसाहेब भोईर ट्रस्ट आणि पिंपरी चिंचवड महिला बचत गट महासंघ यांच्या वतीने आयोजित न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम झाला. त्यात पूनम शंखपाळ यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे.

भोईरनगर चिंचवड येथिल मनीषा स्मृति निवास, सांस्कृतिक कार्यक्रम झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या कार्यक्रमामध्ये सुमारे सहाशे महिलांनी सहभाग घेतला. महिला बचत गट महासंघ्याच्या अध्यक्षा किरण हर्षवर्धन भोईर म्हणाल्या, ”महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी महासंघाच्या वतीने उपक्रम राबविला.”

कार्यक्रमामध्ये मधुसूदन ओझा यांनी विविधी खेळ आणि स्पर्धा घेत आपल्या विनोदी शैलीमध्ये धमाल करत रंगत आणली. यावेळी प्रभागातील सुमारे १५ महिला बचत गटांचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, माजी अध्यक्ष वैशाली काळभोर, शिवसेना शहर संघटिका सुलभाताई उबाळे, पिंपरी चिंचवड महिला बचत गट महासंघाच्या अध्यक्ष किरण भोईर, सुरेखा काळभोर, प्रतिभा कंकाळे, नीलम शिंदे, मनीषा शहा, लता चौगुले, रत्ना शेगर, अर्चना बोरसुने, भारती पाटील, मंगळ ढगे, नंदा गांगुर्डे,वैशाली जिंदे, संजीवनी निकाळजे, सुप्रिया भिंगारे, अनिता गायकवाड उपस्थित होते.

विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये बक्षीस वितरण केले. पूनम शंखपाळ (प्रथम), कावेरी दोडमणी (दुसरा)अक्षदा  गट्टूवार (तृतीय) यांनी बक्षीस मिळविले. तसेच यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले .सर्व सहभागी महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या वेळेस सर्वांसाठी भोजनव्यवस्था करण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!