आरोग्य व शिक्षण

कात्रज मेट्रोला निधी कमी पडू देणार नाही – अजित पवार

Spread the love

पुणे : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात विकास कामाच्या उद्घाटनाला वेग आला आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शहरातील विकास कामांचे उद्घाटन झाले .त्यावेळी कात्रज मेट्रोला निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले .नगरसेवक युवराज बेलदरे यांच्या प्रयत्नातून कात्रज डेरी ते वंडर सिटी सहकार महर्षी मामासाहेब मोहोळ या पंचवीस वर्षे प्रलंबित असणाऱ्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा पवार यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, कात्रज दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, नगरसेवक विशाल तांबे, प्रकाश कदम, नगरसेविका अमृता बाबर, स्मिता कोंढरे,अप्पा रेणुसे, नानासाहेब बेलदरे आदींसह नागरिक उपस्थित होते.

या वेळी पवार म्हणाले, वाढत्या नागरीकरणामुळे हा रस्ता होणे गरजेचे होते. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी लोक सहकार्याची गरज आहे. कृपा करून कचऱ्याची स्वतः विल्हेवाट लावा. उघड्यावर कचरा टाकू नका असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर पाणी, रस्ते ,वीज, उद्याने, क्रीडांगणे, स्मशानभूमी अशा मूलभूत सुविधांवर काम करण्यात येईल. या सुविधा देण्यासाठी कुठेही कमी पडणार नसल्याचा विश्वास पवार यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!