ताज्या घडामोडी

रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी किरण उर्फ भैय्या सामंत

Spread the love

रत्नागिरी 

रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी किरण उर्फ भैय्या सामंत यांच्यासह अन्य सर्व पदांची बिनविरोध निवड झाली. कार्याध्यक्ष आणि सचिवपदासाठी अत्यंत चुरस होती; मात्र त्यावर तोडगा काढण्यात आला.

असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा व्यंकटेश हॉटेल मारुती मंदिर रत्नागिरी येथे झाली. या सभेमध्ये नवीन कार्यकारणी करण्यात आली. अध्यक्ष पदावर किरण उर्फ भैया सामंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या पदावर मंत्री उदय सामंत कार्यरत होते. संघटनेच्या सचिवपदी बिपिन बंदरकर व खजिनदारपदी प्रदीप साळवी यांची तर कार्याध्यक्ष दत्तात्रय ऊर्फ बाळू साळवी, उपाध्यक्षपदी दीपक मोरे, दीपक देसाई, तांत्रिक सल्लागार सईद मुकादम, सुरेश जैन, सहसचिव किशोर भुते, रमेश कसबेकर, हेमंत साळवी, निलेश भोसले, दीपक पवार,  लाल्या खातू, अमित लांजेकर, सुनील घोसाळकर, बलराम कोतवडेकर, श्रद्धानंद सावंत, दिनेश माईन, सचिन कुलकर्णी, निखिल देसाई, मनोहर गुरव यांची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, कार्याध्यक्ष आणि सचिवपदासाठी संघटनेत इच्छुक होते. माजी सचिव दिपक मोरे यांचेही नाव चर्चेत होते. प्रत्यक्ष निवडणुकीवेळी कार्याध्यक्षपदी बाळू साळवींना तर सचिवपदावर बिपिन बंदरकर यांना संधी देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!