क्रीडा व मनोरंजनमावळसामाजिक

इनरव्हील क्लब ऑफ तळेगांव दाभाडे तर्फे पोलीस बंधू भगिनींसोबत रक्षाबंधन सण साजरा.

Spread the love

इनरव्हील क्लब ऑफ तळेगांव दाभाडे तर्फे पोलीस बंधू भगिनींसोबत रक्षाबंधन सण साजरा.Innerwheel Club of Talegaon Dabhade celebrates Raksha Bandhan with police brothers and sisters.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, दि. ३० ऑगष्ट.

इनरव्हील क्लब ऑफ तळेगांव दाभाडे मधील सभासदांनी तळेगांव दाभाडे, लिंब फाटा पोलीसचौकी मधील पोलीस बांधवांना राख्या बांधून सण साजरा करण्यात आला  पोलिस हे समाजासाठी अविरत, अव्याहतपणे कार्य करत असतात. सामाजिक सुरक्षा आणि सलोख्यासाठी ते  सदा रक्षणार्थ कायम तत्पर असतात. सदैव ताणतणावाचा सामना करीत असतात. रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्याची जाणीव ठेवून कृतज्ञता व्यक्त करण्याचे प्रेसिडेंट संध्या थोरात यांनी ठरवले व राखी बांधल्या, तद्नंतर चा  त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता.

विशेष म्हणजे तेथील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनाही राख्या बांधल्या. अनपेक्षित सुखद धक्क्याने महिला पोलिस कर्मचाऱ्यांनाही विशेष आनंद झाला. प्रेसिडेंट संध्या थोरात यांनी इनरव्हील क्लब बद्दल थोडक्यात माहिती दिली.

सेक्रेटरी निशा पवार, जॉईंट सेक्रेटरी रश्मी थोरात, सीसी संगीता शेडे, पास्ट प्रेसिडेंटस् शर्मिला शहा व वैशाली जामखेडकर तसेच साधना भेगडे, ज्योती देशपांडे, शलाका वाणी, अरुणा कुलकर्णी, चांदनी गांधी, मोहिनी भेगडे यांनी पोलिस बांधवांना शुभेच्छा देत रक्षाबंधन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!