क्रीडा व मनोरंजनसामाजिक

सरस्वती विद्यामंदिर मध्ये रक्षाबंधन उत्साहात साजरा ..

बालवाडी व प्राथमिक विभागातील शिक्षिका व विद्यार्थीनी यांनी वानप्रस्थाश्रम येथील आजी-आजोबांना रक्षाबंधन निमित्त राखी बांधली.

Spread the love

सरस्वती विद्यामंदिर मध्ये रक्षाबंधन उत्साहात साजरा;बालवाडी व प्राथमिक विभागातील शिक्षिका व विद्यार्थीनी यांनी वानप्रस्थाश्रम येथील आजी-आजोबांना रक्षाबंधन निमित्त राखी बांधली .

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे वार्ताहर, ३० ऑगष्ट.

श्रावण शुद्ध पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा. या दिवशी भाऊ बहिणीचे अतुट नाते असलेला ‘राखी पौर्णिमा’ हा सण साजरा करण्यात येतो. त्याच्या पूर्वसंध्येला सरस्वती विद्या मंदिर तळेगाव दाभाडे येथील विविध विभागात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

१४ ऑगस्ट ला विद्यार्थ्यांची पर्यावरण पूरक राखी बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली होती . मंगळवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी बालवाडी व प्राथमिक विभागातील शिक्षिका व विद्यार्थीनी यांनी वानप्रस्थाश्रम येथील आजी-आजोबांना रक्षाबंधन निमित्त राखी बांधली .त्याचप्रमाणे माध्यमिक विभागात गाईडच्या विद्यार्थिनींना घेऊन सांगळे बाई व देशमाने बाई पोलीस स्टेशन येथे गेल्या होत्या. तेथील पोलीस बांधवांना त्यांनी राख्या बांधल्या.सीआरपीएफ येथील जवानांना विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या व सैनिकांसाठी लिहिलेले पत्र देण्यात आले . वर्गा वर्गातून विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या .स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक राखी तयार करून ती झाडाला बांधली. त्याचप्रमाणे राष्ट्रीय हरित सेना आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यातर्फे पर्यावरण पूरक राखी झाडाला बांधण्यात आली.

महिला शिक्षिकांनी पुरुष शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना राख्या बांधल्या. त्याचप्रमाणे मुलांची वाहतूक करणारे शाळेतील परिवहन समितीतील वाहन चालक ,स्वच्छता कामगार, पोस्टमन यांना देखील महिला शिक्षकांनी राख्या बांधल्या. संस्थेचे अध्यक्ष माननीय  सुरेश झेंड यांनी सर्व सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. बालवाडी विभाग प्रमुख सोनाली काशीद ,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक  नवनाथ गाढवे व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा परदेशी यांनी आपल्या विभागातील शिक्षक ,विद्यार्थी व पालकांना राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!