आरोग्य व शिक्षण

मावळातील शिरे – शेटेवाडी गावाच्या पुनर्वसन मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

मागणी मान्य न झाल्यास करणार जलसमाधी आंदोलन

Spread the love

मावळ :आंध्रा धरण प्रकल्पाने बाधीत तालुक्यातील शिरे शेटेवाडी या गावांचे शंभर टक्के पुनर्वसन करावे या मागणीसाठी शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पंधरा दिवसात मागणी मान्य न झाल्यास जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशारा समितीचे अध्यक्ष शांताराम कदम यांनी दिला आहे.

या आंदोलनादरम्यान नवलाख उंबरे एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारे मंगळूर येथील जॅकवेल बंद करत आंदोलन करण्यात आले.

1998 साली मावळातील आंध्रा धरणाला मंजुरी मिळाली. यात 13 गावातील शेतकऱ्यांची 600 एकर जमीन पाण्याखाली गेली. यामध्ये शेटेवाडी गावाचाही समावेश आहे.गेली 24 वर्षे हे गाव पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. इतके वर्ष उलटूनही पुनर्वसन न झाल्याने शेतकर्‍यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक होत नवलाख उंब्रे एमआयडीसी मधील कंपन्यांना होणारा पाणीपुरवठा बंद केला आहे.इतके वर्ष होऊनही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही हे दुर्दैव आहे अशी भावना यावेळी शेतकर्‍यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!