आरोग्य व शिक्षण

सेवाधाम हॉस्पिटलच्या वतीने 27 मार्च रोजी महाआरोग्य शिबीराचे आयोजन

Spread the love

तळेगाव दाभाडे : सेवाधाम ट्रस्ट संचालित सेवाधाम हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे येथे रविवार (दि. २७ मार्च) रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत महाआरोग्य शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून तज्ञांच्या मार्फत नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिरादरम्यान बालरोग, अस्थिरोग, स्त्रीरोग, हृदयरोग, शस्त्रक्रिया, आहार, जनरल फिजिशियन, मूत्ररोग, मेंदूरोग, फिजिओथेरपी, लहान मुलांची शस्त्रक्रिया या विभागाचे तज्ञ उपलब्ध असणार आहेत. एक्स-रे, सीटी स्कॅन, रक्त-लघवी तपासणी यावर तीस टक्के सवलत तर औषधांवर 20 टक्के सवलत देण्यात येणार असल्याची माहिती सेवाधाम हॉस्पिटल प्रशासनामार्फत देण्यात आले आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून वेगवेगळ्या गावांमध्ये नियोजनबद्ध आरोग्य शिबीरे घेतली जात आहेत. हजारो रुग्णांवर उपचार केले जात आहेत. नवलाख उंबरे, सुदुंबरे, निगडे, इंदोरी आणि माळेगाव या गावांमध्ये घेण्यात आलेल्या शिबिरामुळे त्याचा लाभ आजुबाजूच्या पंचक्रोशीतील गावांनी व रूग्णांनी घेतला. असे “सेवाधाम ट्रस्ट” या सेवाभावी संस्थेचे संस्थापक विश्वस्त डॉ. कृष्णकांत वाढोकर यांनी सांगितले. रविवारी होऊ घातलेल्या सेवाधाम हॉस्पिटलमधील शिबीराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!