आरोग्य व शिक्षण

औढे खुर्द गावात गुढीपाडव्यानिमात्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

Spread the love

लोणावळा : औढे खुर्द गावात गुढीपाडव्यानिमात्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून ता.२ ते ता.४ पर्यत कीर्तन , प्रवचन , काकडाआरती , भजन आदी कार्यक्रम होणार आहेत. ता. २ रोजी शनिवारी पहाटे ४ ते ६ काकडाआरती , सायंकाळी ४ ते ६ हरिपाठ , सायंकाळी ५ ते ६ ह.भ.प.विकास महाराज खांडभोर (नागाथली ) यांचे प्रवचन व राञी ७ ते ९ ह.भ.प.पांडुरंग महाराज साळुंखे (पलूस ) यांचे कीर्तन होईल. ता.३ रोजी ह.भ.प. बाबाजी महाराज काटकर ( उकसान ) यांचे प्रवचन व राञी ह.भ.प.शिवाजी महाराज पहाने (भिगवन ) यांचे कीर्तन होईल. ता.४ रोजी सकाळी साडेनऊ ते साडेअकरा ह.भ.प. गणेशमहाराज कार्ले (पुणे ) यांचे काल्याचे कीर्तन होईल.

या कीर्तनास मृदूंगमणी संतोषमहाराज घनवट , श्रीहरी घनवट,गणपत मिस्ञी , तसेच संतोषमहाराज घनवट शिष्यपरिवार साथसंगत करणार असून गायनाचार्य नामवंत गायक उपस्थित राहणार आहेत, असे औढे ग्रामस्थांनी प्रसिध्दीस दिलेल्या पञकात म्हटले आहे. सप्ताहाचे हे तेरावे वर्ष आहे, अशी माहिती मृदूंगाचार्य ह.भ.प.तुकाराम बुवा घनवट यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!