ताज्या घडामोडी

चरण येथिल चोरीप्रकरणी दोघांना अटक

Spread the love

कोकरूड/ वार्ताहर
शिराळा तालुक्यातील चरण येथील दुर्गा हॉटेलचे मालक संजय आनंदा पुजारी वय – 52 यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी,घुसून शस्त्राचा धाक दाखवून, अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटून पोबारा करताना बीऊर येथे नाकाबंदी करणाऱ्या शिराळा पोलिसांच्या पथकाला एक आरोपी हाती लागला तर उर्वरित दोन आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेल्याची घटना घडली या घटनेचा गुन्हा कोकरूड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान कोकरुड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांना घटनेची माहिती मिळताच पोलिस पथकासोबत घटनास्थळी धाव घेतली त्यांना तीन इसम काळ्या रंगाच्या ऍक्सेस मोटारसायकलवरून शिराळ्याच्या दिशेने पळून जात असल्याची माहिती मिळाली. सपोनि वाघ यांनी तात्काळ शिराळा पोलीस ठाणे,कुरळूप पोलीस ठाणे व इस्लामपूर हायवे पेट्रोलिंग मोबाईल, यांना घडल्या प्रकाराची कल्पना दिली. यानंतर नाकाबंदी करण्यात आली. कोकरूड शिराळा रोडवर बिऊर गावाजवळ
यावरून शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी करण्यात आली होती.यावेळी हवालदार चंद्रकांत कांबळे, अमर जाधव , महेश साळुंखे तसेच होमगार्ड एस.एस. मेतूगडे, एम.आर. चव्हाण यांनी मोटारसायकलचा पाठलाग करून संशयित शलमून प्रफुल्ल कांबळे (वय २६ रा इस्लामपूर) यास पकडले दरम्यान एकास शनिवारी अटक करण्यात आली.
अधिक तपास सपोनि ज्ञानदेव वाघ करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!