अध्यात्मिकमावळसामाजिक

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचेतर्फे वारकरी दिंड्यांना चहा व आल्पोपहार वाटप आणि उत्स्फूर्त स्वागत..

दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न.

Spread the love

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचेतर्फे वारकरी दिंड्यांना चहा व आल्पोपहार वाटप आणि उत्स्फूर्त स्वागत ; दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, ७ डिसेंबर.

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचेतर्फे वारकरी दिंड्यांना चहा व आल्पोपहार वाटप आणि उत्स्फूर्त स्वागत ;दिनदर्शिका प्रकाशन सोहळा स्वामी निरजानंद सरस्वती ( परमहंस ), कीर्तनकार माऊली महाराज ठाकर , माजी पंचायत समिती उपसभापती  शांताराम कदम, शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख सुरेशभाऊ गायकवाड, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक शिवाजी आण्णा पवार, माजी आदर्श सरपंच संतोषजी जांभुळकर, मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार शिवराम भसे, ह.भ.प.गोपीचंद महाराज कचरे, पंचायत समिती सभापती निकिताताई घोटकुले, उद्योजक नितीनशेठ घोटकुले, मंडळाचे उपाध्यक्ष दिलीपशेठ वावरे, कार्याध्यक्ष संतोषबुवा कुंभार, सचिव रामदासजी पडवळ, मार्गदर्शक महादुबुवा नवघणे आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी आलेल्या कोकणदिंडीचे , मावळ तालुका दिंडी समाजाचे दिंडीचे शाल, श्रीफळ देवून, अल्पोपहार देवून स्वागत करण्यात आले.स्वामी निरजानंद सरस्वती यावेळी मार्गदर्शन करताना आशिर्वाद देताना म्हणाले. मावळ तालुका वारकरी सांप्रदायाची सुरूवात लहान असली, तरी या रोपाचा वेल गगणावर जायला वेळ लागणार नाही, असेच उत्तूंग व्यक्तिमत्त्व ह.भ.प.नंदकुमार शिवरामदादा भसे यांचे आहे, सर्वांनी संत ज्ञानेश्वर माऊली, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे अभंगांचा विचार घेवून वाटचाल केली हे फारच सुंदर कार्य आहे.

यावेळी सूञसंचालन सचिव रामदास पडवळ यांनी केले.स्वागत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार भसे यांनी केले.व प्रास्ताविक माजी उपसभापती शांताराम कदम यांनी केले. आभार ह.भ.प.गोपीचंद कचरे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!