मावळलोणावळा

भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुण्यस्मरणानिमित लोणावळा शहरात विविध पक्ष ,संघटना यांतर्फे विनम्र अभिवादन.

Spread the love

भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुण्यस्मरणानिमित लोणावळा शहरात विविध पक्षसंघटना यांतर्फे विनम्र अभिवादन.

आवाज न्यूज :  मंच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, ७ डिसेंबर.

भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुण्यस्मरणानिमित लोणावळा शहरात विविध पक्ष ,संघटना यांतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. आरपीआयच्या वतीने दीक्षाभूमी येथे महामानव , भारतरत्न डाॕ.आंबेडकर यांचे उभा पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.तसेच नगरपरिषदेसमोर पुतळ्यास ही अभिवादन करण्यात आले. यावेळी आरपीआय चे
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे आणि आनेक पदाधिकारी पुणे जिल्हा , मावळ तालुका, लोणावळा शहर येथून जमले होते. सर्वांनी विश्वरत्न, डाॕ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवास मानवंदना दिली. पुष्पहार अर्पण केले.समोर मेणबत्ती पेटवून बुध्दवंदना म्हटली गेली.

सुर्यकांत वाघमारे साहेब, अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र रिपाई (आ ) यांच्या मार्गदर्शन खाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.ता.६ डिसेंम्बर महापरीनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी लोणावळा दिक्षा भूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिकृती उभा पुतळा दर्शनासाठी उपलब्ध करण्यात आला आहे.आपली दिक्षाभूमी कशी दिसणार आहे. हे चित्ररुपी प्रदर्शित करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब यांचा अर्धाकृती पुतळा व महापुरुषांचे पुतळे असलेले, लोणावळा नगरपालिका येथील संकल्प भूमी,येथे भारतीय बौद्ध महासभा मावळ च्या वतीने वंदना घेण्यात आली. विधी कर्ते विजय देसाई, व अशोक मोरे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, दिक्षा भूमी लोणावळा येथे मा. सुर्यकांत वाघमारे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली भारतीय बौद्ध महासभा व बौद्धजण हितकरणी सभा ट्रस्ट च्या वतीने सभेचा कार्यक्रम करण्यात आला.व यावेळी सर्वांना आल्पोपहार देण्यात आला, व भारतीय बौद्ध महासभा चे 2024 चे कॅलेंन्डर मोफत वाटण्यात आले आहे.
ता.६ डिसेंबर 2023 दुपारी 12:00 वाजता
मानवंदना च्या कार्यक्रमात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!