आरोग्य व शिक्षण

सोमाटने टोलनाका हटविण्यासाठी 16 एप्रिलला सर्वपक्षीय आंदोलन

Spread the love

तळेगाव : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील सोमाटणे फाटा येथील टोल नाका पूर्णपणे बेकायदेशीर आहे. हा टोलनाका लवकरात लवकर बंद करावा अशी मागणी तळेगाव दाभाडे येथे सर्वपक्षीय नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. टोलनाका हटाव ही मागणी करत तीव्र आंदोलनाचा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी दिला आहे.

सोमाटणे फाटा येथील टोलनाका हटाओ यासाठी जनसेवा विकास समिती प्रयत्नशील आहे. या टोल नाक्यावर स्थानिकांकडून टोल वसुली केली जाते. स्थानिकांकडून या टोल नाक्यावर टोल वसूल केला जाणार नाही अशी आश्वासने आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी दिली. परंतु प्रत्यक्षात मात्र टोल वसुली सुरूच आहे. या विरोधात 16 एप्रिल रोजी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने सोमाटना टोलनाक्यावर आंदोलन करण्यात येणार आहे.

या बैठकीला मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी, जनसेवा विकास समिती, भाजप, आरपीआय यांच्यासह विविध संघटनांनी हजेरी लावली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!