आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

बेमुदत प्लास्टिक मुक्त रायगड मोहिमेचा तेरावा दिवस.

रायगडाच्या सेवेत अजूनही आम्ही कर्तव्य बजावत आहोत आणि शरीरात प्राण असेपर्यंत अखंडपणे सेवा करतच राहू .वर्षा चासकर .

Spread the love

बेमुदत प्लास्टिक मुक्त रायगड मोहिमेचा तेरावा दिवस.
तुम्ही पण्याची एक बाटली अगदी सहजच किल्ल्यांच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये टाकता.
पण हे लक्षात असूद्या की याच सह्याद्रीचा श्वास मोकळा करण्यासाठी तुम्ही टाकलेली ती एक बाटली काढण्यासाठी आज आम्ही आमचा जीव सुद्धा धोक्यात टाकत आहोत.
आमच्या थोरल्या स्वामींनी आम्हाला इतिहासाच्या जीवंत खुणा दिल्या आहेत.
त्याच सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर आम्ही प्लास्टिकचा हा गनीम कसा सहन करावा?
आज १३ दिवस झालेत घर दार सोडून श्री रायगडाच्या सेवेत अजूनही आम्ही कर्तव्य बजावत आहोत
आणि शरीरात प्राण असेपर्यंत अखंडपणे सेवा करतच राहू.
पण प्लॅस्टिकची ती एक बाटली आणि इतर कचरा टाकण्याआधी हा व्हिडीओ नक्की पहा.
आपल्या कृत्याची थोडीशी लाज वाटली तर आपली रिकामी बाटली पुन्हा खाली घेऊन या.
तुमची हीच कामगिरी आज सह्याद्रीला तिचं सौंदर्य परत करेल.
दुर्गरक्षक फोर्स
_ वर्षा चासकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!