आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

औंढे , औंढोली , कुसगाव , डोंगरगाववाडी परिसरात आवणीची लगबग..

सुमारे पंधरा वीस दिवसांनी पावसाने हजेरी लावल्यामुळे वअतिवृष्टी मुळे मावळाच्या पश्चिम पट्ट्यात शेतातील रोपाचे नुकसान झाले.

Spread the love

औंढे , औंढोली , कुसगाव , डोंगरगाववाडी परिसरात आवणीची लगबग..

आवाज न्यूज लोणावळा ता.२४(प्रतिनिधी ) मच्छिंद्र मांडेकर, औंढोली , कुसगाव , डोंगरगाववाडी परिसरात आवणीची लगबग सध्या सुरू झाली आसून अतिवृष्टीत अनेक शेतक-यांचे शेतात भातरोपांची हानी झाली असल्याने या शेतक-यांचे शेतातील पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सुमारे पंधरा वीस दिवसांनी पावसाने हजेरी लावल्यामुळे वअतिवृष्टी मुळे मावळाच्या पश्चिम पट्ट्यात ताजे , पिंपळोली , बोरज , पाटण , मळवली , देवले , कार्ला , सदापूर , औढे , औंढोली , भाजे , कुरवंडे , कुसगाववाडी , कुसगाव बुद्रूक , तसेच वाकसई ते जेवरेवाडी , दहिवली , वेहेरगाव , शिलाटणे , टाकवे खुर्द या गावातील शेतातील रोपाचे नुकसान झाले..ज्या शेतकऱ्यांनी विंधन विहीर , नदीतील , विहीरीचे पाण्यावर भातरोपे वाढविली , त्या शेतकऱ्यांनी भातरोपांची लागवड सुरू केली आहे.

खाडे वाडी , औंढे खुर्द येथील प्रगतीशील शेतकरी आनंता खाडे यांनी विंधन विहीरीचे पाण्यवर रोपे केली आसून भातलागवड करताना शेतकरी शेतात दिसत असल्याचे चिञ आहे.
अनेक शेतक-यांचे शेतात रोपेच वाहून गेली आसल्याने शेतकऱ्यांनी भातलागवड कशी करायची , रोपे कशी उपलब्द होणार , शेते ओसाड राहण्याची भीती औंढोलीत , औंढे येथे औंढे विकास सोसायटी चेआरमन पंढरीनाथ मांडेकर आणि व्हाईस चेअरमन सुरेश आंबेकर यांनी सांगितले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!