आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

तळेगाव स्टेशन : वीज महावितरण क्षेत्रात अदानी कंपनीस परवान्यास विरोध..

महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी,अधिकारी,अभियंता संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील ठाणे व नवी मुंबई परिसरातील महावितरण कंपनीच्या अधिपत्याखालील क्षेत्रात अदानी इलेक्ट्रिकल कंपनीस चालवायला देण्यासाठी समांतर परवान्यास विरोध करण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला..

Spread the love

तळेगाव स्टेशन : वीज महावितरण क्षेत्रात अदानी कंपनीस, परवान्यास विरोध..

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे ( स्टेशन ) १८ डिसेंबर.

महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी,अधिकारी,अभियंता संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील ठाणे व नवी मुंबई परिसरातील महावितरण कंपनीच्या अधिपत्याखालील क्षेत्रात अदानी इलेक्ट्रिकल कंपनीस चालवायला देण्यासाठी समांतर परवान्यास विरोध करण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.या बाबतचे निवेदन मावळचे आमदार सुनील शेळके यांना शुक्रवारी(दि.१६) तळेगाव दाभाडे येथे देण्यात आले. यावेळी अशोक कलादगी, सुखदेव मालपोटे, अनील ताटे, शंकर बंडगर, महेंद्र सीताफळे, नरेंद्र भुइगळ, प्रशांत गवारी, संदीप सरोदे, सागर शेळके, प्रशांत गाजरे, दुर्गा चौधरी आदी वीज महापारेषण,महावितरण कंपन्यांतील विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

गेली अनेक वर्षापासून वीज कर्मचारी,अभियंता,अधिकारी वीज महावितरणच्या माध्यमातून शासनाच्या वतीने शेतक-यांना आदी वीज ग्राहकांना वीज पुरवठा करण्याचे काम करीत आहे. ज्या वेळी राज्यावर महापूर, भुकंप, वादळे, कोरोना महामारी आदी नैसर्गिक संकटे आली यावेळी जीवावर उदार होवून वीज कामगारांनी वीज पुरवठा करण्याचे काम केले. वीज ग्राहक महावितरण कडून खाजगी भांडवलदार यांच्याकडे गेलेतर वीज ग्राहकांना वीज दरवाढीचा मोठा फटका बसू शकतो.

यापूर्वी असे प्रयोग निरर्थक अपयशी ठरले आहेत. तसेच महापारेषण कंपनीतील विविध विविध विभागात खाजगी भांडवलदारांकडून खाजगी मालकीच्या वाहिन्या टाकण्याचे काम राज्यात चालू आहे. तसेच महानिर्मिती कंपनीतील मालकीचे जलविद्युत प्रकल्प खाजगी तत्वावर चालवण्याचे प्रयत्न शासन दरबारी चालू आहेत. या सर्वांचा परिणाम राज्यातील सर्वसामान्य जनतेवर होवू शकतो. याबाबत कृपया दखल घ्यावी अशा आशयाचा उल्लेख निवेदनात केलेला आहे. याबाबत लक्ष घालण्यात येईल आणि वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास माझा जाहीर पाठिंबा असेल असे आश्वासन आमदार सुनील शेळके यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!