आरोग्य व शिक्षणकृषीवार्ता

कृष्णराव भेगडे स्कूलच्या शिवम राय याची उंच उडीत विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी निवड..

पुणे जिल्हा विभाग पुणे , यांच्यावतीने तुळजाराम चतुरचंद विद्यालय बारामती येथे झालेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत कृष्णराव भेगडेचा शिवम राय याने 14 वर्षाखालील वयोगटात उंच उडीत द्वितीय क्रमांक मिळवून त्याने विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी झेप घेतली.

Spread the love

कृष्णराव भेगडे स्कूलच्या शिवम राय याची उंच उडीत विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी निवड..

आवाज न्यूज ; तळेगाव दाभाडे, १९ डिसेंबर.

शनिवार दि. 17 डिसेंबर 2022. तळेगाव दाभाडे. तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित, कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या इ. 8 वी च्या शिवम रायची 14 वर्षाखालील वयोगटात उंच उडीत विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. पुणे जिल्हा विभाग पुणे , यांच्यावतीने तुळजाराम चतुरचंद विद्यालय बारामती येथे झालेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत कृष्णराव भेगडेचा शिवम राय याने 14 वर्षाखालील वयोगटात उंच उडीत द्वितीय क्रमांक मिळवून त्याने विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी झेप घेतली. मावळ तालुक्यातून विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असल्यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

त्याचबरोबर संस्थेचे संस्थापक.चंद्रकांत काकडे , संस्थेचे अध्यक्ष . संदीप काकडे, शाळेच्या मुख्याध्यापिका. मीना अय्यर, तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने त्याचे खूप खूप अभिनंदन करण्यात आले. या विद्यार्थ्याला त्याचे क्रीडाशिक्षक . गोरख काकडे व सुवर्णा झणझणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!