आरोग्य व शिक्षणकृषीवार्ता

गोष्ट छोटीशी… समाधान देणारी…!!चाहूल नववर्षाची

नवीन वर्षाचे कॅलेंडर खरेदी करताना मुद्दामच या अंध कुटुंबाकडून खरेदी.. प्रा. अंकुश गुंड..

Spread the love

 

गोष्ट छोटीशी… समाधान देणारी…!! चाहूल नववर्षाची..

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे प्रतिनिधी, २७ डिसेंबर.

चाहूल नववर्षाची….!! आज नवीन वर्षाचे कॅलेंडर खरेदी करताना मुद्दामच या अंध कुटुंबाकडून खरेदी केले.अभिमान वाटला या कुटुंबांचा दोघेही अंध असूनही कोणाकडून कसलीही अपेक्षा न ठेवता व्यवसाय करत आहेत. रेल्वे स्टेशनच्या पुलावर बसले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं कष्टाने कमवुन खात आहे कोणापुढे भिक नाही मागत. मित्रांनो नवीन वर्षाचं कॅलेंडर असो किंवा कुठलीही आवश्यक गोष्टी खरेदी करताना आपल्या गरजू लोकांकडूनच करा कारण ते श्रीमंत होण्यासाठी नाही तर जगण्यासाठी धडपडत असतात.

तुम्ही ऑनलाइन किंवा एखाद्या मूजोर व्यावसायिक कडुन खरेदी करुन जो आनंद आणि समाधान तुम्हाला मिळणार नाही तो एखाद्या गरीब आणि गरजू लोकांकडून मिळेल कारण त्यामागे त्यांचे आशिर्वाद असतात.

तुम्ही घासाघीस न करता जेव्हा खरेदी करता तेव्हा त्या गरीब आणि गरजू व्यावसायिकाच्या चेहर्यावर एक वेगळच समाधान लाभ आणि त्याच्या कष्टाचं देखील चीज होत हे महत्त्वाचे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!