आरोग्य व शिक्षणक्राईम न्युज

मावळात दोन गटात राडा; फायरींग व कोयत्याने मारहाण,तीनजण गंभीर जखमी..

या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नसून माझे नाव मुद्दाम गोवण्यात आले आहे, तरी पोलीस तपासात पूर्ण सहकार्य करणार.. किशोर आवारे.संस्थापक जनसेवा विकास समिती..

Spread the love

मावळात दोन गटात राडा; फायरींग व कोयत्याने मारहाण,तीनजण गंभीर जखमी..

नायगाव ( कामशेत) येथे दोन टोळक्य़ात तुफान हाणामारी झाली असून यामध्ये एकमेकांवर कोयत्याने व दगडाने मारहाण करत फायरींग देखील केली आहे. हा प्रकार सोमवारी सायंकाळी पाच वाजता घडली.

कामशेत पोलीस ठाण्यात सोमनाथ उर्फ स्वामी गायकवाड व आकाश शंकर लालगुडे यांनी एकमेकांच्या विरोधात मंगळवारी (दि.27) पहाटे फिर्याद दिली आहे.यावरून पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेत योगेश अनंता गायकवाड, प्रमोद सोपान सांडभोर, मंगेश भीमराव मोरे हे गंभीर जखमी झाले आहेत.

अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नायगाव हद्दीत नवनाथ नथु चोपडे यांच्या घरासमोर किरकोळ वाद मिटविण्यासाठी आलेल्या 11 जणांसह इतर तसेच उपस्थित 10 जणांसह इतर यांच्यात किरकोळ वादातून दोन टोळ्यांमध्ये कोयत्याने दगडाने व पिस्तुलमधून फायरिंग करून तुफान हाणामारी झाली. यात देवा गायकवाड यांचा भाऊ योगेश गायकवाड यांच्या डोक्याला व हाताला गंभीर जखमा झाल्या. तसेच प्रमोद सांडभोर व मंगेश मोरे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यावेळी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या सांगण्यावरून हे भांडण झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मात्र, त्यांच्यासोबत संपर्क केला असता, या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नसून माझे नाव मुद्दाम गोवण्यात आले आहे, तरी पोलीस तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचे आवारे यांनी सांगितले.

या गुन्ह्याचा पुढील तपास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!