आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाचा क्रीडा महोत्सव संपन्न.

कमला शिक्षण संकुल च्या प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी क्रीडा विभागा अंतर्गत वार्षिक क्रीडा महोत्सव घेऊन त्यामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

Spread the love

प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाचा क्रीडा महोत्सव संपन्न.

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी, २० जानेवारी.

कमला शिक्षण संकुल च्या प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी क्रीडा विभागा अंतर्गत वार्षिक क्रीडा महोत्सव घेऊन त्यामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेमध्ये धावणे, गोळा फेकी व उड्यांचा समावेश केला होता.तसेच सीट अप्स,पुशअप्स, दोरी वरच्या उड्या घेण्यात आल्या.

क्रीडा महोत्सवाचे उदघाटन कनिष्ठ महाविद्यालयाच्या उप प्राचार्या डॉ वनिता कुऱ्हाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.सोबत विज्ञान शाखेच्या समन्वयिका डॉ सुनीता पटनाईक,व वाणिज्य शाखेच्या समन्वयिका प्रा.जास्मिन फरास उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आनंद खेळण्याचा आनंद घेतला.
विद्यार्थ्यांचा सहभाग आणि शिक्षकवृंदांच्या सहकार्यामुळे या स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्या. क्रीडा महोत्सवास संस्थेचे सचिव डॉ दिपकजी शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे यांनी प्रोत्साहन देऊन शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा विभाग प्रमुख प्रा.शबाना शेख यांनी केले व आभार क्रीडा शिक्षक प्रा.अक्षयकुमार परदेशी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!