आरोग्य व शिक्षण

मदर टीचर सन्मानित दमयंती खान यांचे निधन..

Spread the love

मदर टीचर सन्मानित दमयंती खान यांचे निधन.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, १ फेब्रुवारी.

जुन्या पिढीतील आदर्श शिक्षिका दमयंती आफताब खान (वय 85) यांचे मंगळवारी (ता. 31) तळेगाव दाभाडे येथे हृदय विकाराच्या तीव्र झटक्यामुळे निधन झाले.
मावळ तालुक्यात त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत 39 वर्षे अध्यापन केले. 1994 साली जागतिक आरोग्य संघटनेच्या अमेरिकेतील शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या उर्सेगाव प्राथमिक शाळेच्या भेटी दरम्यान मुख्याध्यापिका दमयंती खान यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांना ‘मदर टीचर’ म्हणून गौरविले होते.
पत्रकार अमिन खान आणि आकुर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते हमीद खान यांच्या त्या मातु:श्री होत. त्यांच्या पश्चात एक मुलगी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!