क्रीडा व मनोरंजनमावळ

बेंगलोर येथे राष्ट्रीय बेंच प्रेस स्पर्धेत तळेगाव च्या खेळाडूंचे घवघवीत यश.

Spread the love

बेंगलोर येथे राष्ट्रीय बेंच प्रेस स्पर्धेत तळेगाव च्या खेळाडूंचे घवघवीत यश.Talegaon’s sportsmen made a big splash in the national bench press competition at Bangalore.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २८ नोव्हेंबर.

तळेगाव दाभाडे, दिनांक 23 ते 26 नोव्हेंबर २०२३ दरम्यान बेंगलूर इथे पार पडलेल्या राष्ट्रीय बेंच प्रेस स्पर्धेत चमकदार कामगिरीचे प्रदर्शन करत तळेगाव दाभाडे च्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करत पदकांची कमाई केली. तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी जिमची खेळाडूं कु. साक्षी रोहिदास म्हाळसकर हिने 63 kg ज्युनियर गटात कांस्य पदक पटकावले तसेच 69 kg मास्टर गटात राजश्री विनायक वाघचौरे यांनी रौप्य पदक तर 76 kg ज्युनियर गटात कु सेजल विश्वनाथ मोईकर हिने सुवर्ण पदक मिळवले व स्ट्राँग वुमन ऑफ इंडिया चा किताब मिळवून दुहेरी मुकुट मिळवला. हे सर्व खेळाडू इंद्रायणी जिम तळेगाव चे प्रशिक्षक श्री. छत्रपति पुरस्कार विजेते नितीन वसंत म्हाळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. या स्पर्धेला इंद्रायणी महाविद्यालयाचे अध्यक्ष रामदास काकडे व खजिनदार चंद्रकांत शेटे यांनी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!