आरोग्य व शिक्षणकृषीवार्ता

प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज (सी.बी.एस.ई बोर्ड) मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

Spread the love

प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज (सी.बी.एस.ई बोर्ड) मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी.  

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी २० फेब्रुवारी.

कमला एज्युकेशन सोसायटीचे प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज (सी.बी.एस.ई बोर्ड) मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 

विद्यालयात ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला. शिवजयंती निमित्त विद्यालयात रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यात छोट्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केली होती. विद्यार्थ्यांनी शिवचरित्राची माहिती दिली तर विद्यार्थी ईशान गाडेकर व शिवराज निलांगी यांनी तालासुरात पोवाडा सादर केला. यावेळी कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सविता ट्रॅवीस व उपमुख्याध्यापिका लिजा सोजू उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका सविता ट्रॅवीस यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून साहसी व शूर होण्याविषयी शिकवण घेण्यास सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका आरती सुतार यांनी केले. क्रार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी योगदान दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!